Friday, September 2, 2022

खोकेबंद विचार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

खोकेबंद विचार

राजकारणाला सत्तेची,
सत्तेला राजकारणाची नशा आहे.
जिकडे बघावे तिकडे,
आजकाल खोक्यांची भाषा आहे.

राजकारण आणि सत्ताकारण,
ज्याच्या त्याच्या डोक्यात आहे!
सगळी तोंडे बंद करायची ताकद,
खोक्यात आणि खोक्यात आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8030
दैनिक झुंजार नेता
2सप्टेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...