आजची वात्रटिका
---------------------------
हवामान तज्ञ
सोशल मीडियाच्या जमान्यात,
अनेक लोक अज्ञाचे सूज्ञ झाले.
पावसाचा अंदाज सांगणारे,
नको तेवढे हवामानतज्ञ झाले.
कुणी अभ्यासू,कुणी धंदेवाईक,
कुणाची आपली हौस आहे.
प्रत्यक्ष पावसापेक्षाही,
अर्धवटरावांचाच पाऊस आहे.
बेजबाबदार हवामानतज्ञांची,
वेधशाळेच्या हो ला हो आहे !
पाऊस नको;पण अंदाज आवरा,
असा शेतकऱ्यांचा टाहो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6592
दैनिक पुण्यनगरी
28सप्टेंबर 2022

No comments:
Post a Comment