आजची वात्रटिका
----------------------------
गर्दी रहस्य
सभेला गर्दी लागते,
सभेला वर्दी लागते.
वाटेल ते ऐकण्यासाठी,
सभाही दर्दी लागते.
सभा कुणाचीही असो,
गर्दीला पैसे मोजले जातात.
विकतच्या गर्दीला,
फुकटचे डोस पाजले जातात.
सर्वांनाच माहीत असते,
सगळेच विकाऊ आहे!
गर्दी गर्दीला सांगते,
सगळेच दिखाऊ आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6579
दैनिक पुण्यनगरी
13सप्टेंबर 2022

No comments:
Post a Comment