Sunday, September 4, 2022

बाराचे तीन तेरा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
बाराचे तीन तेरा
कुणासाठी अज्ञात होते,
कुणासाठी ज्ञात झाले.
त्यांच्या आमदारकीच्या स्वप्नांचे,
एकदाचे गर्भपात झाले.
आमदारकीसाठी जे कासावीस,
ते तर बाराचे बारा होते.
दुर्दैवाने त्यांच्या नशिबात,
जणू लिहिलेले तीन तेरा होते.
महाविकास आघाडीला काही,
राज्यपल राजी झाले नाहीत !
आमदारांना आजी होता आले नाही,
म्हणूनच ते माजी झाले नाहीत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6572
दैनिक पुण्यनगरी
4सप्टेंबर 2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...