Friday, September 23, 2022

श्रेयवादाचा सिद्धांत.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

श्रेयवादाचा सिद्धांत

लाटल्याशिवाय श्रेय,
कधीच श्रेय वाटत नाही.
ओढून घेतल्याशिवाय,
कधीच श्रेय भेटत नाही.

ज्याला ताणायचे आहे,
तो तो खुशाल ताणीत आहे.
हाजीर तो वजीर,
हेच श्रेयवादाचे गणित आहे.

सगळे काही माहित असूनही,
आपल्या नावाचा गजर असतो!
केवळ हा योगायोगाचा भाग,
जो कोणी वेळेला हजर असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8049
दैनिक झुंजार नेता
23सप्टेंबर2022

 

No comments:

घराणेशाहीचा न्याय.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------------- घराणेशाहीचा न्याय पक्ष नवा असो की जुना, घराणेशाही काही सुटत नाही. पुन्हा पुन्हा तेच सांगायला, आम्...