Friday, September 16, 2022

निष्ठेचा भावार्थ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

निष्ठेचा भावार्थ

जेवढे कट्टर, तेवढे सच्चे,
निष्ठेचे मोजमाप आहे.
निष्ठा मोजता मोजता,
आपल्यालाच धाप आहे.

तिकडेही कट्टर होते,
इकडेही कट्टर आहेत.
सरळ सरळ कट्टर होते,
वाकडेही कट्टर आहेत.

निष्ठा जेवढी कट्टर,
तेवढीच ती वाकावू आहे!
निष्ठेला भाव आहे,
कारण ती विकाऊ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6582
दैनिक पुण्यनगरी
16सप्टेंबर 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 243वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1onWAiM6-oAvD7-Xpbhj...