Friday, September 2, 2022

भविष्याचे वर्तमान... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

भविष्याचे वर्तमान

उंदीर मोजले,बिळं मोजले,
खिचडीसुद्धा शिजून झाले आहे.
जनावरांबरोबर माणसांचीही,
शौचालयेसुद्धा मोजून झाले आहे.

मतदान आणि जनगणनेला तर,
सुरुवातीपासूनच ताणलेले आहे.
पोरांना शिकविण्यापेक्षाही मोठे,
तेच 'राष्ट्रीय कर्तव्य' बनलेले आहे.

दीड शतकापेक्षाही मोठी,
अशैक्षणिक कामांची यादी आहे!
गुरुजनांच्या मानगुटीवर बसलेली,
दिल्ली आणि गल्लीतली खादी आहे!!

इतरांनी नाकारलेले काम,
गुरुजींच्या गळ्यामध्ये पडते आहे!
उद्याच्या भारताचे भविष्य असे,
शाळांच्या वर्गखोल्यातून घडते आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6570
दैनिक पुण्यनगरी
2 सप्टेंबर 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -316वा

दैनिक वात्रटिका 18एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -316वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1H7R0AkBWdW9aUDYPkGh5Z...