Saturday, September 3, 2022

निष्ठेची किंमत... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

निष्ठेची किंमत

आपल्या हाताने आपली,
आज बेइज्जत आणि चेष्टा आहे.
नेत्यांपुढे गोंडा घोळणे,
जणू याचेच नाव आज निष्ठा आहे.

घोळ म्हटले की,घोळवा लागतो,
चोळ म्हटले की,चोळावा लागतो.
छू म्हटले की,भो म्हणणारा,
सच्चा कार्यकर्ता पाळावा लागतो.

निष्ठा फक्त असून चालत नाही,
निष्ठा वेळोवेळी दाखवावी लागते !
फेकल्या तुकड्याला जागण्यासाठी,
निष्ठेची किंमत चुकवावी लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6571
दैनिक पुण्यनगरी
3सप्टेंबर 2022

 

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...