Friday, September 9, 2022

धर्म चिकित्सा..... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

धर्म चिकित्सा

आपल्या धर्माची चिकित्सा,
धर्मांधांना अजिबात आवडत नाही
आमचा सोडून दुसऱ्याचा धर्म,
चिकित्सेसाठी का निवडत नाही?

सर्वच धर्मांधांना वाटते,
आपले सवाल मार्मिक असतात.
जे करतात धर्म चिकित्सा;
त्यांच्या मते,ते अधर्मिक असतात.

धर्मचिकित्सकांना रोखले जाते,
त्यांच्यावर विष ओकले जाते !
मानवता हाच खरा धर्म आहे,
हे वाक्य फक्त घोकले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6577
दैनिक पुण्यनगरी
9सप्टेंबर 2022
-----------------------

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...