Monday, September 12, 2022

यशाचे दावेदार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

यशाचे दावेदार

शाळा - कॉलेजात दाखले,
क्लासेसच्या जाहिराती आहेत.
विद्यार्थ्यांच्या यशाचे,
बघा वाटेकरी किती आहेत?

एका विद्यार्थ्याच्या यशावर,
अनेक क्लासेसचे दावे आहेत!
इथे विद्यार्थी कुणालाच नकोत,
फक्त परीक्षार्थी हवे आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8039
दैनिक झुंजार नेता
12सप्टेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...