Wednesday, September 7, 2022

झिंग झिंग झिंगाट .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

झिंग झिंग झिंगाट

लोककल्याण राहिले बाजूला,
केवळ तुताऱ्या फुंकायच्या अस्तात.
सर्वांचे उद्दिष्ट एकच असते,
निवडणुका जिंकायच्या असतात.

जिंकण्यासाठी वाट्टेल ते,
हाच सगळ्यांचा नारा असतो.
आपणच खरे लोक उद्धारक,
हाच सगळ्यांचा तोरा असतो.

तोऱ्यामध्ये आणि नाऱ्यामध्ये,
ते झिंग झिंग झिंगलेले असतात!
जशा लोकांच्या आशा टांगलेल्या,
तशी स्वप्नही भंगलेले असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6575
दैनिक पुण्यनगरी
7सप्टेंबर 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...