Tuesday, September 20, 2022

रेन अपडेट्स ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
रेन अपडेट्स
पाऊस नको पण,
अंदाज आवरा;
असेच व्हायला लागले.
पावसाचे सुधारित अंदाज,
रोज नव्याने यायला लागले.
आपल्याच लहरीपणावर,
पावसाचे शिक्के आहेत!!
येताना आणि जातानाही,
पावसाचे धक्के आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8047
दैनिक झुंजार नेता
20सप्टेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...