Sunday, September 18, 2022

वेदांत .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

वेदांत

आरोपांवर प्रत्यारोपांची तर
उघड खेळवा-खेळवी आहे.
प्रकल्पांची जशी वळवा-वळवी,
तशीच ती पळवा-पळवी आहे.

ज्यांची त्यांची प्रतिक्रिया,
एकदमच विरोधी टोकाची आहे
जुळवा-जुळवी करून सांगा,
झाकली मूठ किती लाखाची आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6583
दैनिक पुण्यनगरी
18सप्टेंबर 2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...