Tuesday, September 13, 2022

समर्थक... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

समर्थक

भाजलेल्या पोळ्या,
उचललेल्या तळ्या असतात.
राजकीय समर्थक म्हणजे,
पाळलेल्या टोळ्या असतात.

पाळलेल्या टोळ्यांवरच,
राजकारण आधारित असते!
प्रत्येक नवी आवृत्ती
मागच्यापेक्षा सुधारित असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8040
दैनिक झुंजार नेता
13सप्टेंबर2022

 

No comments:

वर्धापन दिन

आजची वात्रटिका -------------------- वर्धापन दिन जसे एकाचे दोन झाले, तसे दोनाचे चार झाले. जिकडे बघावे तिकडे, वर्धापन दिन फार झाले. ज्यांचा त्...