Thursday, September 15, 2022

चमत्कारिक राष्ट्रसंत... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

चमत्कारिक राष्ट्रसंत

कितीतरी भोंदू बुवा बाबा,
रंगेहात पकडले जात आहेत.
तरीही आंधळ्या भक्तांचे हात,
कुठे आखडले जात आहेत ?

बुवा तिथे बाया हा प्रकार,
तसा नित्याचाच झाला आहे.
भक्तांचे बाबालाच सर्टिफिकेट,
ही तर बाबांची लीला आहे.

लफड्यांचे डफडे वाजले तरी,
बुवाबाजीला कुठे अंत आहेत?
काही बुवा बाबा चमत्कारिक,
काही स्वयंघोषित राष्ट्रसंत आहेत!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6581
दैनिक पुण्यनगरी
15सप्टेंबर 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...