Thursday, September 8, 2022

विज्ञान आणि प्रदर्शन.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

विज्ञान आणि प्रदर्शन

फक्त प्रदर्शनापुरतेच,
शाळा शाळात विज्ञान आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मात्र,
अज्ञान एके अज्ञान आहे.

पोहरे तरी करणार काय?
जिथे कोरडेच आड आहेत.
विज्ञानापेक्षा अज्ञानावर,
त्यांच्या श्रद्धाही गाढ आहेत.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव,
तरीही सायन्सकडेच ओढा आहे!
सगळ्या बोलक्या पोपटांचा,
अभ्यास मात्र खूप गाढा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6576
दैनिक पुण्यनगरी
8सप्टेंबर 2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...