Monday, September 5, 2022

गुरुजनांस विनंती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
गुरुजनांस विनंती
गुरुजी स्वाभिमानी व्हा,
गुरुजी आत्मभिमानी व्हा.
तुम्ही ज्ञानी तर आहातच,
अद्यावत असे महाज्ञानी व्हा.
बोलणारे बोलत राहतील,
त्यांची तोंडे दिसू शकतात.
नासके कांदे सर्वत्रच आहेत,
ते तुमच्यातही असू शकतात.
आत्मपरीक्षण करत रहा,
कुठल्याही टीकेचे भय नाही.
संपन्न आणि सजग आहात,
तुमच्याकडे उपद्रवमूल्य नाही.
तुमच्यातली गुणवत्ताही दिसावी,
ठळक फक्त तुमचे दोष नको !
कुणाच्या नकारात्मक दृष्टिकोनाचा,
निष्पाप विद्यार्थ्यांवर रोष नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6573
दैनिक पुण्यनगरी
5सप्टेंबर 2022
------------------------

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...