Tuesday, September 27, 2022

मराठी गरबा.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

मराठी गरबा

राजकीय ध्रुवीकरणाचे,
हेच नवे सार आहे
आता गुजराती गरब्याचा
मराठी अवतार आहे.

सध्या तरी काही जणांना,
काही गोष्टी उपऱ्या दिसतील!
उद्या गुजराती ढोलावर,
मराठी टिपऱ्या असतील!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-8052
दैनिक झुंजार नेता
27सप्टेंबर2022

 

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...