Monday, September 19, 2022

चित्ताकर्षण ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
चित्ताकर्षण
कुणी मिरविले पेंग्विन,
कुणी चित्ते मिरवीत आहेत.
राजकारणाचा भाग म्हणून,
जणू ते कित्ते गिरवीत आहेत.
काल वेगळे सरकार होते,
आज वेगळे सरकार आहे.
लोक काय म्हणतात?
यांची कुणाला दरकार आहे ?
भारत बदलतो आहे,
हे तर चित्ताकर्षक वाक्य आहे!
काल सोडलेल्या कबुतरांमुळेच,
आज हे सारे शक्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6584
दैनिक पुण्यनगरी
19सप्टेंबर 2022

1 comment:

Anonymous said...

Ok

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...