आजची वात्रटिका
---------------------------
उत्सवप्रियता
याचे त्याला टेकण आहे,
त्याचे याला टेकण आहे.
उत्सवाऐवजी उन्मादाची,
जाहीर पाठराखण आहे.
उत्सवातून उन्माद नाही,
एकता वाढली पाहिजे.
समाजाला पुढे नेणारी,
कृती घडली पाहिजे.
उत्सव उत्सव व्हावेत,
उत्सवांचा संघर्ष होवू नये !
पाठराखण करता करता,
उन्मदाला फूस देवू नये !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6593
दैनिक पुण्यनगरी
29सप्टेंबर 2022

No comments:
Post a Comment