Friday, September 30, 2022

गौप्यस्फोट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

गौप्यस्फोट

कुणाच्या कृतीत खोट आहे,
कुणाच्या हेतूत खोट आहे.
उशिरात उशिरा बोलले की,
म्हणतात हा गौप्यस्फोट आहे.

कुणाच्याही गौप्यस्फोटाला,
कुठे काळाचे बंधन असते?
आपलीच विश्वासार्हता,
विरोधकांना आंदण असते.

कुणाचे गौप्यस्फोट म्हणजे,
पाठीमागून केलेले वार असतात!
त्यांना गौप्यस्फोट वाटले तरी,
बहुतेकदा ते फुसके बार असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6594
दैनिक पुण्यनगरी
30सप्टेंबर 2022

 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...