Sunday, September 18, 2022

गीतरामायण.... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------------

गीतरामायण

पुन्हा नवीन कैकयी,
पुन्हा नवी मंथरा आहे.
पुन्हा नव्याने रामायण,
पुन्हा नवा अंतरा आहे.

एक भोगतो सजा?
जे दुसऱ्याचे पाप आहे.
कुणाच्या नशीब शाप,
कुणाच्या नशीब उ:शाप आहे.

पुन्हा नवी अग्निपरीक्षा,
पुन्हा नवे सिताहरण आहे!
पुन्हा नवा वनवास,
पुन्हा रावणाचे मरण आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8045
दैनिक झुंजार नेता
18सप्टेंबर2022

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...