Thursday, September 8, 2022

लबाडी....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

लबाडी

लबाडांच्या मागे,
लबाड लपू लागले.
आपली लबाडी,
लबाडीने मापू लागले.

लबाडीचे मापच,
असे आडमाप आहे.
लबाडांना वाटत नाही,
यात काही पाप आहे.

लबाडांकडून लबाडीचे,
जाहीर उदात्तीकरण आहे!
लबाडांच्या दुनियेत,
सच्चाईचे मरण आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8036
दैनिक झुंजार नेता
8सप्टेंबर2022

 

No comments:

daily vatratika...29jane2026