Sunday, September 4, 2022

अवहेलना.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
अवहेलना
पांडव ठरले दुर्लक्षित,
झोतामध्ये कौरव आहेत.
पांडवांची अवहेलना,
कौरवांचे गौरव आहेत.
जुन्याच महाभारतचे,
आज पुन्हा नवे अंक आहेत!
इमानदारीच्या नावाने,
तेव्हापासूनच शंख आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8032
दैनिक झुंजार नेता
4सप्टेंबर2022

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...