Wednesday, September 14, 2022

राजकीय यात्रा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

राजकीय यात्रा

जत्रा वर जत्रा होत्या,
आता यात्रावर यात्रा आहेत.
राजकीय यात्रा म्हणजे,
निवडणुकीवरील मात्रा आहेत.

इतर मात्रा चालली नाही की,
राजकीय यात्रांची लाट येते!
दिल्लीपर्यंत पोहोचण्याची,
राजकीय यात्रा हीच वाट होते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6580
दैनिक पुण्यनगरी
14सप्टेंबर 2022

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...