Monday, September 12, 2022

सांस्कृतिक चालना.. मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

----------------------------

सांस्कृतिक चालना

पळवापळवी आणि जुळवाजुळवी,
कालचा हा प्रकार जणू थोडा आहे.
आपण शिव शिव शिव शिव म्हणावे,
असा सैनिकांचा राडा एके राडा आहे.

कुणी जुन्या घरी स्थायिक आहेत,
कुणी नव्या घरी स्थायिक आहेत.
कौतुकास्पद गोष्ट अशी की,
ते एकाच परंपरेचे ते पाईक आहेत.

राजकीय शिवधनुष्य पेलण्याची,
सैनिका- सैनिकांत तुलना आहे !
जणू आपल्या राडा संस्कृतीला,
पुन्हा एकदा नव्याने चालना आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6578
दैनिक पुण्यनगरी
12सप्टेंबर 2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...