Thursday, September 29, 2022

इमोशनल ब्लॅकमेल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

इमोशनल ब्लॅकमेल

दुखावण्याचा हेतू नसला तरी,
धार्मिक भावना दुखावल्या जातात.
धार्मिक भडका उडाला की,
धार्मिक भावना सुखावल्या जातात.

भावना सुखावणे आणि दुखावणे,
सगळा गोष्टी धार्मिक असतात!
जे असतात चिथावणीखोर,
तेच अफवांचे निर्मिक असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8054
दैनिक झुंजार नेता
29सप्टेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...