Friday, September 23, 2022

झुंज तुझी माझी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

झुंज तुझी माझी

याचे त्याला झोंबते आहे,
त्याचे याला झोंबते आहे
नागडा म्हणतो उघड्याला,
खाली काय लोंबते आहे?

कुठे झोंबाझोंबी चालली आहे,
कुठे लोंबालोंबी चालली आहे.
कुठे चालली कोंबाकोंबी,
कुठे चुंबाचुंबी चालली आहे.

कुणाचा मनगटावर चुना,
कुणाची बोंबला बोंबली आहे!
त्यांना कळते पण वळत नाही,
जनता याला आंबली आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6588
दैनिक पुण्यनगरी
23सप्टेंबर 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 14 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...