Monday, September 5, 2022

खडू म्हणाला फळ्याला... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका

----------------------------
खडू म्हणाला फळ्याला
आला शिक्षक दिन आला,
सावध हो रे भिडू.
रेघोट्या ओढीत ओढीत,
फळ्याला म्हणाला खडू.
शिक्षकच खुपतात डोळ्यात,
हल्ली शिक्षकच टार्गेट आहेत.
ज्याच्या त्याच्या सोयीचे,
सगळेच अजेंडे सेट आहेत.
आपलाच होतोय त्रागा,
तो काही उगा नाही !
सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी,
शाळा राजकारणाची जागा नाही !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------फेरफटका-8033
दैनिक झुंजार नेता
5सप्टेंबर2022

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...