Wednesday, August 10, 2022

सोपी देशभक्ती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सोपी देशभक्ती

तिरंग्याने नटलेला,
ज्याचा त्याचा डी.पी.आहे.
पुन्हा नव्याने सिद्ध झाले,
देशभक्ती खूप सोपी आहे.

ते झाले देशद्रोही,
ज्यांच्या डी.पी.ला तिरंगा नाही.
अजून तरी डी.पी.वरून,
देशामध्ये कुठेही दंगा नाही.

झेंडे लावा, डी.पी.ठेवा,
पण केवळ वन डे नको !
एरव्ही जबाबदाऱ्या झटकून,
आपण निव्वळ संडे नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8008
दैनिक झुंजार नेता
10ऑगस्ट2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...