Monday, August 22, 2022

आधुनिक महाभारत... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

आधुनिक महाभारत

जसे कुणी पांडव आहेत,
तसे कुणी कौरव आहेत.
ज्याच्या त्याच्या भाटांकडून,
ज्याचे त्याचे गौरव आहेत.

गांधारी पट्टीची आंधळी,
धृतराष्ट्र तर जन्मांध आहे.
कृष्ण आपल्या लिलेत दंग,
कर्ण दुर्योधनात धुंद आहे.

शकूनी तर अपशकुनी,
अर्जुनाचे अजूनही मरण आहे!
महाभारत कोणतेही असो,
द्रौपदीचेच वस्त्रहरण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8021
दैनिक झुंजार नेता
22ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 243वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1onWAiM6-oAvD7-Xpbhj...