Monday, August 8, 2022

झेंडा आहे,घर नाही..., मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

झेंडा आहे,घर नाही...

कुणाला घर आहे;झेंडा नाही,
कुणाला झेंडा आहे;घर नाही.
गरीब बिचाऱ्या भारताला,
श्रीमंत इंडियाची सर नाही.

इंडियात आणि भारतात,
कुठलीच एकवाक्यता नाही !
घर असेल तर झेंडा मिळेल,
मात्र झेंड्यासाठी घर मिळण्याची,
कुठलीच शक्यता नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8006
दैनिक झुंजार नेता
8ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 243वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1onWAiM6-oAvD7-Xpbhj...