आजची वात्रटिका
---------------------
कोर्ट मॅटर
ओढाओढी चालली आहे,
धनुष्य आणि बाणाची.
कोर्टही लवकर सांगेना,
खरी शिवसेना कोणाची?
त्याच्या वरती भाष्य नको,
जे जे कोर्ट मॅटर आहे !
आगे आगे देखो होता है क्या?
हेच बेस्ट आणि बेटर आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8028
दैनिक झुंजार नेता
30ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment