Wednesday, August 24, 2022

भ्रष्ट गुणधर्म... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

भ्रष्ट गुणधर्म

काडीने खा, बचकीने खा,
शेवटी लाच ही लाच असते.
अब्रू म्हणजे तरी काय?
शेवटी तीही काच असते.

काचेला तडे गेले तरी,
भ्रष्टाचार रोखत नाही !
चारणारा आल्याशिवाय,
खाणारा काही सोकत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8023
दैनिक झुंजार नेता
24ऑगस्ट2022

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...