Friday, August 26, 2022

मनसे अपडेट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

मनसे अपडेट

जरी लेट होतो आहे,
तरी थेट होतो आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
पक्ष अपडेट होतो आहे

मी हिंदू रक्षक,
मी महाराष्ट्र सेवक आहे.
महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटवर,
आता भगवे देवक आहे.

महाराष्ट्राची सेवा,
हिंदुत्वाचा भोंगा आहे !
लोकप्रियता लाभूनही,
मतदारांचा ठेंगा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6564
दैनिक पुण्यनगरी
26ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 243वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1onWAiM6-oAvD7-Xpbhj...