Thursday, November 18, 2021

स्वातंत्र्याचा पोट भेद....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

स्वातंत्र्याचा पोट भेद

काल जे दुसरे कुणी म्हणाले,
तेच आज तिसरे म्हणत आहेत.
कालच्याहुन आजचे,
कमालीचे वादग्रस्त बनत आहेत.

कालचे भुकेल्या पोटाने म्हणत होते,
आजचे सगळे भरल्या पोटी आहे !
काल दाखवला तो सामाजिक भेद,
आजचे सामाजिक दुहीसाठी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6324
दैनिक पुण्यनगरी
18नोव्हेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...