Monday, November 8, 2021

झिंग झिंग झिंगाट , मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

झिंग झिंग झिंगाट

चौक्यावर चौके आहेत,
छक्क्यावर छक्के आहेत.
पारंपरिक क्रिकेटला,
ट्वेंटी-ट्वेंटीचे धक्के आहेत.

बॉलर्सची कुचंबणा,
बॅट्समन मात्र सैराट झाले !
प्रेक्षकांचा वाढला जल्लोष,
ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट म्हणजे,
झिंग झिंग झिंगाट झाले!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6314
दैनिक पुण्यनगरी
7नोव्हेंबर2021

 

No comments:

daily vatratika...3april2025