Monday, November 1, 2021

सरकारी जावई....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सरकारी जावई

आवई वर आवई,
पुन्हा नवी आवई आहे.
आरोपांच्या तडाख्यात,
मंत्री आणि जावई आहे.

जावयाच्या जातीच्या,
सर्व अडचणी पार होतात !
सासऱ्याच्या मंत्रीपदावर,
जावई सुभेदार होतात !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6309
दैनिक पुण्यनगरी
1नोव्हेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...