Tuesday, November 9, 2021

भय इथले 'संप'त नाही... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भय इथले 'संप'त नाही...

संघटना नावाच्या पिलावळी,
जेंव्हा पॉलिटिकल गँग होतात.
तेंव्हा संविधानिक हत्यारेही,
दुर्दैवाने चक्क बुमरॅंग होतात.

जेवढे संपकर्ते आक्रमक,
तेवढे संपफोडे सक्रीय होतात!
जेंव्हा दुही माजली जाते,
तेंव्हा तहसुद्धा निष्क्रिय होतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6315
दैनिक पुण्यनगरी
9नोव्हेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 28जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 240 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 28जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 240 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1mR6zilDHwx3Wx8Ci9x...