Monday, November 22, 2021

भ्रष्ट कुलवृत्तांत...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भ्रष्ट कुलवृत्तांत

असे कोणी समजू नका,
भ्रष्टाचारीच फक्त भ्रष्ट असतो.
भ्रष्टालाच भ्रष्ट म्हणणे,
हा मार्ग सोपा आणि बेस्ट असतो.

भ्रष्टाचाराला निमूट पाठिंबा देणारे,
भ्रष्टाचाऱ्याहून भ्रष्ट असतात!
भ्रष्टाचाराला व्यवहार म्हणणारे,
भ्रष्टकुलाचे कुलश्रेष्ठ असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6328
दैनिक पुण्यनगरी
22नोव्हेंबर2021

 

1 comment:

Unknown said...

कटु सत्य

पोट निवडणूक .....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- पोट निवडणूक पोटात एक ओठात एक, तरीही जवळीक वाढली जाते. पोटनिवडणूक असली की, ती बिनविरोध काढली जात...