Sunday, November 14, 2021

थोरांची बालबुद्धी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
थोरांची बालबुद्धी
कदाचित आमचे विचार,
बालिश आणि पोरकट वाटतील.
गंभीरपणे विचार केल्यास,
तेही तुम्हाला पटापट पटतील.
वयाने वाढलेल्यांचे थोरांमोठ्यांचे,
बालदिनाला आगत स्वागत व्हावे !
जे पोरकट आणि बालिश आहेत,
अशांकडे दयाबुद्धीने बघत जावे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6321
दैनिक पुण्यनगरी
14नोव्हेंबर2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...