Tuesday, November 2, 2021

अंडरवर्ल्ड कनेक्शन..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

अंडरवर्ल्ड कनेक्शन

पुराव्यांचे दावे ठोकत,
मिठू मिठू बोलू लागले.
एकमेकांचे अंडरवर्ल्ड,
राजरोस खोलू लागले.

धमाक्यावर धमाका,
प्रत्येकाच्या बोलात आहे.
त्यांचे तेच सांगू लागले,
कोण किती खोलात आहे?

एका ड्रग्ज पार्टीची,
बघा केवढी झिंग आहे?
राजकीय इतिहासातही,
अंडरवर्ल्डचे बिंग आहे !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6310
दैनिक पुण्यनगरी
2नोव्हेंबर2021

 

No comments:

daily vatratika...3april2025