Thursday, November 11, 2021

गौप्यस्फोटांचे गुपित...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

गौप्यस्फोटांचे गुपित


तू माझे झाक;मी तुझे झाकतो,
हे तर राजकीय गृहीत असते.
ज्याला गौप्यस्फोट म्हटले जाते,
ते त्यांना आधीच माहीत असते.

सगळ्या गोष्टी आवडीनुसार,
राजकीय निवडीनुसार होतात!
आरोपांचे गौप्यस्फोट तर,
राजकीय सवडीनुसार होतात !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6317
दैनिक पुण्यनगरी
11नोव्हेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026