Monday, November 22, 2021

मीडिया पॉलिसी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मीडिया पॉलिसी

सर्वसामान्यांचा दुःखाचा,
उठता बसता आकस असतो.
झगमगाटी जगावरती,
मीडीयाचा फोकस असतो.

ते तेच दाखवले जाते,
जे चोवीस तास विकले जाते!
जे डोळे रिझवित नाही,
ते ते कानामागे टाकले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7763
दैनिक झुंजार नेता
22नोव्हेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...