Monday, November 15, 2021

भावी आणि चावी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------


भावी आणि चावी

आज काल जो जो कोणी,
उठता बसता भावी आहे.
त्याला कुणाची ना कुणाची,
उठता-बसता चावी आहे.

कुणी चावी मारली की,
भावी नेते चेकाळू लागले !
दर फुटा फुटाला,
भावी नेते बोकाळू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7756
दैनिक झुंजार नेता
15नोव्हेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...