Wednesday, November 24, 2021

दूध खुळेपणा.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

दूध खुळेपणा

गोंधळात झाला गोंधळ,
ते बोळ्याने दूध पिते झाले.
म्हणूनच नको ते लोक,
नको नको त्यांचे नेते झाले.

लबाड त्यांचा चेहरा,
लबाड त्यांचे नेतृत्व आहे !
आयत्या पिठावर रेखोट्या,
असे त्यांचे कर्तृत्व आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7765
दैनिक झुंजार नेता
24नोव्हेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...