Friday, November 12, 2021

ऑब्जेक्शन माय लॉर्ड !...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

ऑब्जेक्शन माय लॉर्ड !

खोट्या-नाट्या साठी कायदा,
अगदी कोळून प्याला जातो.
विकतचा का होईना,
खोट्याला न्याय दिला जातो.

कुणाच्या हाती असतो हातोडा,
साक्षीला काळा कोट असतो !
वाटा पळवाटा शोधून शोधून,
खऱ्याच्या नरडीचा घोट असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6318
दैनिक पुण्यनगरी
12नोव्हेंबर2021

 

No comments:

चॅनल आणि वॉर ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- चॅनल आणि वॉर इकडे टाकले बॉम्ब, तिकडे क्षेपणास्त्र सुटू लागले आहेत. न्यूज चॅनलवच्या पडद्यावरती, युद्धाचे ढ...