Tuesday, November 23, 2021

कोविड लसीकरण.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कोविड लसीकरण

आपले आयुष्यच,
कोरोनाकडे उधार आहे.
कालपर्यंत आधार कार्ड होते,
आज लसीचे प्रमाणपत्र,
जगण्याचा आधार आहे.

जे घेणार नाही म्हणाले,
त्यांनाही आज सोस आहे !
आयुष्यच बदलून जावे,
असा कोविडचा डोस आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7764
दैनिक झुंजार नेता
23नोव्हेंबर 2021

 

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...