Thursday, November 25, 2021

पेच प्रसंग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पेच प्रसंग

चोर चोरांना घाबरू लागले,
पोलीस पोलिसांना घाबरू लागले.
थोडक्यात सांगायचे तर,
एकमेकांपेक्षा सगळेच गब्रू लागले.

सगळ्यांच्याच गबरूपणामुळे,
त्यांच्या अब्रुवरच टाच आहे !
गोंधळलेल्या कायद्यासमोर,
आपल्या विश्वासार्हतेचा पेच आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
फेरफटका-7766
दैनिक झुंजार नेता
25नोव्हेंबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...