Sunday, November 21, 2021

बहुजन हिताय....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बहुजन हिताय....

लाल परीला ब्रेक लागताच,
अवैध वाहतूक वैध झाली.
लुटा- लुटीबरोबरच
सामान्य प्रवाशांची कैद झाली.

जशी आहे तशी बरी आहे,
शेवटी आपली लाल परी आहे!
घामाचे रास्त मोल मिळावे,
ही गोष्ट सोळा आणे खरी आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7762
दैनिक झुंजार नेता
21नोव्हेंबर 2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026